जिल्ह्यातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्ती प्रदान आदेशाबाबत डीजीलॉकर वापरणे बाबत माहिती देण्यासाठी तसेच ऑनलाईन जीवन प्रमाणपत्राबाबत माहिती देण्यासाठी सामाजिक न्याय भवन येथे दि.4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासभेस निवृत्ती वेतनधारकांनी माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास केले आहे.