बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना गावामध्ये मोठ्या प्रमाणात लंपी आजाराने थैमान घातले आहे. एकाच आठवड्यात जवळपास आठ गाईंचा बळी गेला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यावर शासन स्तरावरून प्रतिबंधक उपाययोजनाही केल्या जात आहे. दरम्यान अशा प्रकारचे आजार दिसल्यास जवळच्या दवाखान्यात संपर्क साधावा असा आव्हानही पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.