खामगाव: जलालपुरा भागात मोठ्या देवीच्या मंडळाचे खांब रोपण
येणाऱ्या ६ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या देवीची स्थापना होणार
६ ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला मोठी देवी उत्सव मोठ्या प्रमाणात खामगाव शहरात साजरा होतो. त्यानिमित्ताने आज आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जलालपुरा भागात मोठी देवी मंडळाच्या वतीने खांब रोपण पूजा करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात मोठी देवी उत्सव साजरा करण्यात येतो तसेच दहा दिवस विविध कार्यक्रम व आनंदाचे वातावरण असते. येणाऱ्या ६ ऑक्टोंबर ला कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या देवीची स्थापना करण्यात येते.