अंघोळीसाठी गरम केलेले उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे गंभीररित्या भाजल्या गेलेल्या उज्वला बुधो इंगळे (वय ६०, रा. समता नगर) या महिलेचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दि. ३ रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी ९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.