दिग्रस: शहरातील वडवाला जीन परिसरात आजपासून घंटीबाबा यात्रेला सुरुवात, संत श्री घंटीबाबांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्य ययात्रा
महान तपस्वी संत श्री घंटीबाबा यांच्या ८०व्या पुण्यतिथीनिमित्ताने दरवर्षी घंटीबाबा मंदिर ते लाठीवाला पेट्रोल पंप या मार्गावर भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. मात्र यंदा वाहतूक समस्या व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने यात्रेचे ठिकाण बदलण्यात येऊन ती घंटीबाबा मंदिर परिसर आणि वडवाला जीन परिसरात आयोजित करण्यात आली आहे. आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान वडवाला जीनच्या भव्य परिसरात पूजा अँम्युजमेंटचे थाटात उदघाटन संपन्न झाले.