अलिबाग: सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रायगड उत्तर व दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची बैठक
Alibag, Raigad | Nov 8, 2025 पक्ष संघटनेच्या जबाबदारीनुसार आज शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास भाजपा रायगड जिल्हा संपर्कमंत्री म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रायगड उत्तर व दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत संघटनात्मक कार्ययोजना, पक्षविस्तार, बुथ स्तरावरील बळकटीकरण तसेच जनतेशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी आवश्यक रणनीतीवर सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीस खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील तसेच भाजपा रायगड जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष व शहराध्यक्ष उपस्थित होते.