चंद्रपूर: संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान रखडले ; जिल्हाधिकार्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.गटाचे निवेदन
शहरातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे अनुदान गेल्या ५ ते ६ महिन्यापासुन मिळालेले नाही. त्यामुळे निराधार व श्रावण बाळ असलेले लाभार्थी त्रस्त झालेले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी आज दि १५ सप्टेंबर २ वाजता जिल्हाधिकार्यांना अनुदान त्वरीत देण्याबाबत निवेदन दिले आहे.यावेळी निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे आदींसह उपस्थित होते.