नागपूर शहर: सुरज नगर येथे वस्तीतच राहणाऱ्या युवकाचा जुन्या वादाच्या कारणावरून खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
15 सप्टेंबरला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबरला रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे गाठोडा हद्दीतील सुरज नगर येथे राहणारा अभिषेक पिंपळीकर वय 25 वर्ष याला त्याच्याच वस्तीत राहणारा आरोपी प्रकाश गायकवाड 23 वर्ष याने जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.