जळगाव: मणियार बंधूंच्या शस्त्र परवान्याबाबत CBIकडे तक्रार करणार: शिवाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे यांची माहिती
आयुष आणि पियुष मणियार यांना तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी गैर मार्गाने शस्त्र परवाना दिला असून आपण याबाबत सीबीआयकडे तक्रार करणार आहोत !'' अशी माहिती छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पद्मालय विश्रामगृह येथे रविवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे. तर या प्रकरणी मणियार बंधूंचा 'आका' शोधण्यासह अमन मित्तल यांच्यावर कारवाईची देखील त्यांनी मागणी केली.