निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू असतानाच नागपुरात एका भाजप उमेदवाराला स्थानिक महिलांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागल्याची घटना समोर आली आहे. प्रचारासाठी गेलेल्या उमेदवाराला महिलांनी विकासकामांवरून चांगलेच धारेवर धरले.भाजपचे उमेदवार आपल्या समर्थकांसह नागपूरच्या परिसर परिसरातील एका वस्तीत मते मागण्यासाठी गेले होते. मात्र, ते वस्तीत शिरताच तेथील महिलांनी त्यांना घेराव घातला.