अक्राणी: सावऱ्यादिगर गावातून आदिवासी सरपंच यांचे थरारक अपहरण ८०० किलोमीटर दूर नेत गोठ्यात डांबलं
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील सावऱ्यादिगर गावातून आदिवासी सरपंच दिलीप राड्या पावरा यांचे थरारक अपहरण करण्यात आले होते. तब्बल ८०० किलोमीटर दूर नेत सांगली जिल्ह्यातील एका गावातील गोठ्यात सरपंच यांचे हातपाय बांधून डांबून ठेवण्यात आले होते. आदिवासी जनजागृती चे पदाधिकारी आणि धडगाव पोलिसांच्या मदतीने अपहरण झालेल्या सरपंचांना सुखरूप आणण्यात आले आहे.