जालना: मनपा शाळांनंतर आता आरोग्य केंद्रांवर लक्ष; आयुक्त अंजली शर्मा यांची विविध केंद्रांना भेट; मुलभुत सुविधांची केली तपासणी
Jalna, Jalna | May 15, 2026 जालना शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. शुक्रवार दि. 15 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी शहरातील विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणी दौर्यात आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नूतन वसाहत, रामनगर येथे भेट दिली.