अकोल्याच्या पातुर तालुक्यातील सावरगाव येथे रस्ता मिळत नसल्याने मंजुळा जानकीराम डाखोरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. घरासमोरील व्यक्तीने घरकुलाचे बांधकाम करून मार्ग बंद केल्याची तक्रार महिलेने वारंवार ग्रामपंचायत व प्रशासनाकडे केली होती. रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन देत प्रशासनाने दोन वेळा त्यांचे उपोषण मागे घ्यायला लावले. मात्र दोन महिने उलटूनही दखल न घेतल्याने अखेर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.