अचलपूर: तहसील कार्यालयातून सॅमसंग टॅब चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
तहसील कार्यालयाच्या आवारातून सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए-८ चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून अचलपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी रुतेज प्रकाश कडू (वय ३५, रा. आरोग्यसेवा कॉलनी, राहटगाव, अमरावती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता त्यांनी आपला सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए-८ तहसील कार्यालय, अचलपूर येथील बेंचवर ठेवला. त्यानंतर ते काही कामानिमित्त बाहेर गेले. काही वेळाने टॅब विसरल्याचे लक्षात येताच ते पुन्हा आवारात परतले, मात्र तो