भंडारा: कारधा चौक परिसरातून रेती चोरीचा मालवाहू ट्रॅक्टर व १७ वर्षीय चालक ताब्यात; १०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा चे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी २:४५ वाजता कारधा चौक परिसरात जिल्हा गस्त पेट्रोलींग करत असताना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले. अंशुल नुरदेव देशमुख (वय १७, रा. मंडनगाव) हा चालक विनाक्रमांकाच्या स्वराज कंपनीच्या लाल रंगाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून १ ब्रास रेती घेऊन जात होता. चालकाने वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना, मालक राहुल निंबार्ते यांच्या सांगण्यावरून रेतीची वाहतूक करत असल्याचे सांगितले.