माहूर: माहूर गडावर दीपावली सण उत्सवात माहूर येथील श्री रेणुका देवीची अलंकार पूजा अर्चना करण्यात आली
Mahoor, Nanded | Oct 21, 2025 आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान माहूर येथे दीपावली सणा निमित्त आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री रेणुका देवी ची अलंकार पूजा करण्यात आली. श्री रेणुका देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. दिवाळीच्या निमित्ताने मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते आज मातेची महाआरती करण्यात आलीय. आकर्षक फुलांची सजावट अन विद्युत रोषणाई मुळे मंदिर परिसर सध्या नयनरम्य बनला आहे.