कर्तव्यदक्ष पोलीसामुळे बेपत्ता मुलास मिळाले आईचे छत्र! अहमदपूर बस स्टँडवर तिकीटासाठी पैसे मागत होता मुलगा; पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन चपडे यांच्या सतर्कतेमुळे झाली पुनर्भेट. नूतन विद्यालय अहमदपूरमध्ये शिकणारा आणि खाजगी वसतिगृहात (हॉस्टेल) राहणारा रुद्रा राजरतन दुधमल (रा. ब्राह्मणवाडा, ता. जि. नांदेड) हा वसतिगृहातून कोणालाही न सांगता पळून गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.