जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात दुचाकी चालविण्यावरून एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी व लाकूड आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.