नांदेड: सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौडचे आयोजन; जुनामोंढा ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत दौड:पोलिस अधीक्षक
Nanded, Nanded | Oct 31, 2025 भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ 150 एकता अभियान’ अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात आज पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत रन फॉर युनिटी दौडचे आयोजन जुना मोंढा ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत करण्यात आले होते. यासंदर्भात पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी आज शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.