जळगाव शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएम मशीन कॅबीनमध्ये शेतकऱ्याचे एटीएम कार्ड अदलाबदल करत भामट्याने खात्यातून 17 हजार रुपये काढल्याचा प्रकार शनिवारी 8 नोव्हेबर रोजी उघडकीस आला. या प्रकरणी सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.