गोंदिया: जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप हलक्या धानाला फटका बसण्याची भीती
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 आठवडाभरापासून रोज अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने आज 16 सप्टेंबर रोजी शहरासह अनेक भागात रिपरिप लावल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते सततच्या पावसामुळे कमी कालावधीच्या धानाला फटका बसण्याची भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे यंदाच्या पावसाळ्याला जरा रडखडतच सुरुवात झाली जून महिन्यात रूसून बसलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार पुनरागमन केले. जुलैमध्ये सरासरीचे 144 तर ऑगस्टमध्ये केवळ 59.6% पाऊस बरसला ऑगस्टमध्ये 40.4% पावसाची तूट होती सप्टेंबर मध्ये आजपर्यंत 110.6 टक्के पाऊस झाला आहे