कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता रो नायलॉन मांजामुळे तीन नागरिक जखमी झाले आहेत.यामध्ये एका नागरिकाच्या नाकाला जबर दुखापत होऊन चार टाके पडल्याची माहिती आहे.जखमींमध्ये मतीन जब्बार मणियार यांचा समावेश आहे. मतीन मणियार हे आपल्या लहान मुलाला दुचाकीवर बसवून जात असताना अचानक मुलाच्या अंगावर नायलॉन मांजा आला. मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना सदर मांजा त्यांच्या नाकावर आल्याने ते गंभीर जखमी झाले.