31 डिसेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह असताना, नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस स्टेशनने ६२ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. गेल्या दीड महिन्यात तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी तब्बल ११ लाख ८३ हजार रुपये किमतीचे ६२ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले आहेत. हे सर्व मोबाईल आता नवीन वर्षाची भेट म्हणून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात येत आहेत.हे मोबाईल शोधण्याचे काम अत्यंत आव्हानात्मक होते. पोलिसांनी केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे,