अर्धापूर: अर्धापूर तालुक्यातील लहान येथे उसाच्या फडात दहा ते बारा फुटाचा अजगर आढळला सर्पमित्राने अजगर याला पकडून सोडले जंगलात
आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील लहान या शिवारात एका उसाच्या फडात दहा ते बारा फुटाचा अजगर आढळून आला. ऊस तोडणी सुरू असताना ऊस कामगारांना हा अजगर आढळून आला. या अजगराची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्राने या अजगराला पकडून जंगलात अधिवासात सोडले.अजगराने लांडोर या पक्षाला भक्ष केले होते. अजगर दहा ते बारा फूट असून अजगराचे वजन 35 ते 40 किलो असल्याची माहिती सर्पमित्र कपिल वसुरे यांनी दिला