कर्जत: कळंब ग्रामपंचायतीत ठाकरे गट व काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत; शिंदे गटाची ताकद आणखी भक्कम
Karjat, Raigad | Nov 6, 2025 कळंब ग्रामपंचायत परिसरातील राजकीय समीकरणात मोठ्या घडामोडी घडत असून शिवसेना (शिंदे गट) आपले शक्तीस्थान आणखी मजबूत करत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत कर्जत येथील बाळासाहेब भवन पक्ष कार्यालयात झालेल्या भव्य प्रवेश सोहळ्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे कळंब ग्रामपंचायत क्षेत्रातील स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकार घेऊ लागले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची पकड अधिक दृढ झाली आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रभावी नेते हरिश्चंद्र निरगुडा यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यातच ठाकरे गट व काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत दाखल झाल्याने हा प्रवेश शिंदे गटासाठी मोठी ऊर्जा देणारा ठरला आहे.