अकोला जिल्ह्यातील पोलीस विभागातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तबादलीची मुदत निश्चित असतानाही एका पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल १७ वर्षे जुने शहर आणि डाबकी रोड या दोनच पोलीस ठाण्यांत सेवा बजावली आहे. जमादार म्हणून नेमणूक झालेल्या या कर्मचाऱ्याने तेल्हारा येथे अल्प काळानंतर पुन्हा जुन्या शहरात बदली करून घेतली. तसेच एमआयडीसी ठाण्यातील एका एएसआयनेही बढतीनंतर सिव्हिल लाईनला बदली झाल्यानंतर पुन्हा एमआयडीसी जॉईन झाले.