केज: केज येथील आंदोलनाला हिंसक वळण लागली असून पाच एसटी बसवर दगडफेक करण्यात आली
Kaij, Beed | Oct 14, 2025 साठवण तलाव आणि इतर मागण्यांसाठी सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सरकार दाखल घेत नसल्याने संतप्त आंदोलक रस्त्यावर उतरले. केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाच तासांपासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान पाच तास उलटून गेल्या नंतरही कुठला तोडगा निघत नसल्याने अज्ञातांनी पाच बसेसवर दगडफेक करून नुकसान केले आहे. त्यामुळे दोन्ही महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून महामार्गावर सुमारे तीन किमीच्या रांगा लागल्या आहेत.