नागपूर ग्रामीण: MNLU नागपूर प्रशासनाच्या भूमिकेविरोधात बसपा आक्रमक; कुलसचिवांवर टाळाटाळ केल्याचा आरोप
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधील आरक्षण, Ph.D. प्रवेश आणि पदभरतीतील कथित अनियमिततेबाबत बहुजन समाज पार्टीने (बसपा) आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या विषयावर प्रशासनाला जाब विचारला, मात्र कुलसचिव दीपक भागवत यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला.