जालना: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सावरगाव हडप ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय तपासणी
Jalna, Jalna | May 25, 2026 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दि. 25 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता सावरगाव हडप ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय तपासणी उत्साहात पार पडली. यावेळी जिल्हास्तरीय समितीने ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.तपासणी समिती गावात दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गावातील महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी समितीने गावातील जिल्हा परिषद शाळा आदी तपासणी केली.