नागपूर ग्रामीण: नरसाळ्यात घरात शिरलेला विषारी नाग सर्पमित्राने केले जेर बंद
श्रेयस नगर येथे राहणाऱ्या राकेश जामदार यांच्या घराच्या जिन्यावर एक ५ फूट लांबीचा विषारी नाग आढळल्याने खळबळ उडाली. रात्री कामवरून परतताना राकेश यांना जिन्यातील मनी प्लांटच्या वेलात काहीतरी हालचाल जाणवली. बारकाईने पाहिले असता तो 'पाईप' नसून एक मोठा विषारी नाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले.