जालना: मनसेच्या हस्तक्षेपाने महिंद्रा फायनान्सच्या ग्राहकाला दिलासा; तीन महिन्यांचा ‘ब्ल्यू’ शुल्क अखेर रद्द
Jalna, Jalna | Jun 12, 2026 महिंद्रा फायनान्स कंपनीकडून वाहन कर्जाचा हप्ता नियमितपणे भरत असतानाही एका ग्राहकाच्या खात्यावर तीन महिन्यांचा ‘ब्ल्यू’ (दंडात्मक/अतिरिक्त) शुल्क लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यामुळे संबंधित ग्राहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात होता. अखेर या प्रकरणी ग्राहकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महिंद्रा फायनान्सच्या कार्यालयात धाव घेत कंपनी व्यवस्थापनाकडे जाब विचारला. यावेळी मनसे पदाध