देऊळगाव राजा: श्री बालाजी महाराज अश्विन उत्सवाची सांगता श्री बालाजी संस्थान येथे काणगीची मोजणी -19 लाख 86 हजार 385 प्राप्त
देऊळगाव राजा प्रति तिरुपती बालाजी म्हणून ओळख असलेल्या शहराचे ग्रामदेव श्री बालाजी महाराज यांच्या अश्विनी उत्सवाची सांगता काणगी मोजून झाली श्री बालाजी संस्थान येथे दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता व्यवस्थापक बिडकर यांनी काणगी जाहीर केली व सर्वांचे आभार व्यक्त केले . श्री बालाजी संस्थांनचे वंशापारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात तसेच मानकरी सेवेकरी भक्तगण यांच्या सहकार्याने अश्विन उत्सव संपन्न झाला