25 डिसेंबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार , यशोधरा नगर येथे चाय विक्रेत्याने गुंडांना खंडणी न दिल्यामुळे त्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान चाकूच्या धाकावर खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी या आधीही या परिवाराला त्रास दिला आहे. याप्रकरणी पुढील तपास यशोधरा नगर पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पीडित व्यक्तीच्या मुलाने दिली आहे. प्रतिक्रिया दरम्यान त्यांनी न्यायाची मागणी केली आहे