भोकरदन: पिंपळगाव थोटे येथून टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंडी रवाना
आज दिनांक 6 जुलै 2026 सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव थोटे येथून टाळा मृदंगाच्या गजरात सालाबदाप्रमाणे यावर्षीही पंढरपूरच्या विठुरायाचे आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी गावकरी पायी दिंडी घेत रवाना झाली आहे याप्रसंगी टाळ मृदंगाचा गजर करत हातात भगवे पताका व महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेत अगदी भक्तिमय वातावरणात विठुरायाचा गजर करत ही पायी दिंडी याप्रसंगी रवाना झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.