शिक्षणाची प्रगती आणि विज्ञानाची नवी भरारी या ध्येयाने प्रेरित होऊन मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आंधळगाव येथे जीवशास्त्र व भौतिकशास्त्र प्रयोगशाळा कक्षाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान अत्यंत उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी व त्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशान...