औंढा नागनाथ: दिल्ली घटनेनंतर औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात अलर्ट बंदोबस्त वरील कर्मचाऱ्यांना सूचना
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात घडलेल्या घटनेनंतर धार्मिक व पर्यटन स्थळांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने भारतातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिरात बंदोबस्त अनुषंगाने पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांनी दिनांक 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता बैठक घेऊन बंदोबस्ता वरील गार्ड कर्मचारी यांना 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.मंदिरात नारळ इतर वस्तू भाविकांना नेऊ देऊ नये तसेच संशयित काही आढळल्यास पोलिसांना संपर्क करण्याच्या सूचना दिल्या