अकोला: खदान पोलीस ठाणे हद्दीत पूर्णा रेल्वे लाईनवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह,खदान पोलिसांकडून पंचनामा, तपास सुरू
Akola, Akola | Sep 15, 2025 पूर्णा रेल्वे लाईनवर १५ सप्टेंबर रोजी दुपारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वे गेटमन यांनी हा प्रकार पाहताच तात्काळ खदान पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (जीएमसी) पाठविण्यात आला. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसून खदान पोलीस तपास करीत आहेत. ही माहिती सायंकाळी सुमारे सात वाजता खदान पोलीसांनी दिली आहे.