पालघर: सोनाळे परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे वाजता परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन दिवाळीच्या सणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची देखील तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे परिसरातील भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे.