औंढा नागनाथ: भोसी ग्रुप ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करा;युवकाचे औंढा पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू
औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी,पाझर तांडा,जांभळी तांडा या ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या भ्रष्ट कामाची चौकशी करून नियमाचे व कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पाझर तांडा येथील ज्ञानेश्वर मोहनसिंग राठोड या युवकाने दिनांक ३ नोव्हेंबर सोमवार रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून औंढा नागनाथ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्याने घेतला आहे