नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारामध्ये जाणीवजागृती करणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे, नवमतदाराला निवडणुकीची प्रक्रिया समजून सांगणे, मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी वर्धा शहरातील गोलबाजार, आर्वी नाका, शिवाजी चौक, बसस्टँड येथे पथनाट्याचे सादरीकरण करुन मतदार जनजागृती केली.