18 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बेलेनगर येथे छापा मार कार्यवाही करून घरगुती गॅसच्या काळाबाजारचा परदाफाश केला आहे. घटनास्थळावरून आरोपी देवा रामटेकेकर व इमरान शेख यांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून सतरा भरलेले सिलेंडर व 10 रिकामे सिलेंडर आणि दोन वाहन असा एकूण सात लाख चोवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी कळमना पोलिसां