दिग्रस: पोलीस स्टेशन आणि क्रीडा संकुल येथे सामूहिक ‘वंदे मातरम’ गायन
भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ या गीतास १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आज दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान दिग्रस पोलीस ठाण्यात सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व बावीस पोलीस अमलदार उपस्थित होते. राष्ट्रगीताच्या या ऐतिहासिक क्षणी सर्वांनी एकात्मतेच्या भावनेने सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चा गजर केला. दरम्यान, दिग्रस तालुका क्रीडा संकुल येथे तहसीलदार मयूर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली देखील सामूहिक गायन केले.