पालघर: इमारतीच्या तळमजल्यावर सिलेंडरचा स्फोट; काशिमिरा येथील घटना, तरुणी जखमी
काशिमिरा येथील ग्रीन व्हिलेज इमारतीतील तळमजल्यावरील खोली क्रमांक चार मध्ये गॅस गळती झाली. बंद खोलीत बराच वेळ वायू साचला होता, निधी कनोजिया ही तरुणी घरात परतल्यानंतर दिवा लावण्याचा प्रयत्न तिने केला यावेळी मोठा स्फोट झाला. स्फोटात तरुणी जखमी झाली आहे तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला काचा आणि दरवाजे फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.