चांदूर बाजार: चांदूरबाजार तालुक्यातील असदपूर येथे चंद्रभागा नदीचे पुलावर, अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
आज दिनांक 16 ऑक्टोबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक 15 ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी चांदूरबाजार तालुक्यातील असदपुर येथील चंद्रभागा नदीच्या पुलावरून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आसेगाव पोलिसांनी कारवाई करून मुद्देमालासहित ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. यामध्ये राम अंकुश नाणेकर, अक्षय आशिष बडवाईक, व फरार असलेल्या अजहर अहमद कैसर नावाच्या युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे