हिंगोली: हिंगोलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला राजकीय भूकंपाचा धक्का जिल्हाध्यक्षसह कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात पुणे येथे प्रवेश
हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असून काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अशी माहिती आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता प्राप्त झाली आहे.