शिरोळ: इचलकरंजीत पावरलूम उद्योजकांचा महावितरण विरोधात तीव्र संताप, दरवाढ मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
महावितरणकडून औद्योगिक वीजदरात अचानक केलेली दरवाढ ही अन्यायकारक व असह्य असून ती तात्काळ मागे घ्यावी,अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी पावरलूम असोसिएशनने आज सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता महावितरणच्या मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.या निर्णयामुळे पावरलूम उद्योग,व्यवसाय तसेच शेतकरी यांच्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.