कळमनूरी: पोत्रा येथे धुरपता माय देवी मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम भव्य दिव्य मिरवणुकीसह मोठ्या थाटात पार
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी धुरपता माय देवी मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम भव्य दिव्य मिरवणूकीसह मोठ्या थाटात पार पडला आहे .सिद्धेश्वर संस्थांचे 1008 पं.पू .आत्मानंद गिरी गुरु सागर संस्थान गांगलवाडी यांच्या शुभहस्ते कलशा रोहणाचा कार्यक्रम करण्यात आला आहे .यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येऊन हा कार्यक्रम होनमाने आणि गावकऱ्यांच्या वतीने यशस्वी पार पडला आहे .