भंडारा: तई/बुज येथे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैध रेती उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत, पालांदूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत, एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह 1 ब्रास रेती जप्त करण्यात आली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री 9:45 वा. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील सहायक पोलीस निरीक्षक भालेराव हे आपल्या पथकासह दिघोरी आणि पालांदूर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत होते. यावेळी, मौजा तई गावाजवळ बोथलीकडून तईकडे येणाऱ्या एका ट्रॅक्टरला त्यांनी..