दर्यापूर: खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील कान्होली गावात घरफोडी;चार आरोपी अटकेत
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कान्होली गावात झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी रात्री १०:१५ मिनिटांनी अटक केली आहे. ही घटना ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता घडली.फिर्यादी उषा सुधाकर सोलंके (वय ५०, रा. कान्होली) यांच्या घरात कोणीच नसताना काही आरोपींनी घरफोडी करून ₹३६,८०० किमतीचा माल लंपास केला. फिर्यादी नातीकडे भेटीसाठी नांदूरबार येथे गेल्या असताना, त्यांची मुलगी वैशालीने फोन करून सांगितले की घरातून कोणीतरी वस्तू घेऊन जात आहेत.