भोकरदन: मुठाड पाटी सिल्लोड रोडवर मालवाहू बोलेरो पिकप गाडीची व दुचाकीची समोरा समोर धडक,45 वर्षीय तरुणाचा मृत्यू
आज दिनांक 22 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत सुमारास भोकरदन तालुक्यातील मुठाड पाटी सिल्लोड भोकरदन रोडवर माल वाहू बोलेरो पिकप गाडीची व दुचाकीची समोरा समोर धडक होऊन दुचाकी स्वार दादाराव आसाराम सोरमारे या 45 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, या अपघाताची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलवला असून दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.